सोया चंक (Soya Chank)

सोया चंक (Soya Chank)

सोया चंक

साहित्यः 1 कप सोया चंक्स्, 1 कप बारीक चिरलेला कोबी, पातळ व बारीक चिरलेला गाजर, सिमला मिरची, 1 टीस्पून सोया सॉस, अर्धा टीस्पून शेजवान सॉस, पाव कप पाणी, 1 टीस्पून कॉर्नफ्लोर, 1 हिरवी मिरची, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.

कृतीः थोडं पाणी गरम करून त्यात मीठ घाला. या पाण्यात सोया चंक्स् भिजत ठेवा व थोड्या वेळाने ते सोया चंक्स् हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाका. कढईत तेल गरम करून त्यात सोया चंक्स् मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्या. एका दुसर्‍या कढईत थोडे तेल घालून सर्व भाज्या परतून घ्या. सर्व सॉस व पाव कप पाणी घाला. कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडे पाणी घालून पेस्ट बनवा व ही पेस्ट भाजीत घाला. गे्रव्ही घट्ट होईपर्यंत कॉर्नफ्लॉवर घाला. या ग्रेव्हीत तळलेले सोया चंक्स् घालून कांद्याच्या पातीने सजवून गरमा गरम सर्व्ह करा.