खट्टा-मिठा-तिखा राइस (Sour-Sweet-Tart Rice)

खट्टा-मिठा-तिखा राइस (Sour-Sweet-Tart Rice)

साहित्य : 2 वाटी बासमती तांदूळ, 1 संत्रं, अर्धा वाटी बारीक टुटी-फ्रुटी, 5-6 संकेश्‍वरी लाल मिरच्या, 2 चमचे चणा डाळ, 10-12 कढीपत्त्याची पानं, 2 टेबलस्पून तूप, स्वादानुसार मीठ.
फोडणीचं साहित्य : अर्धा टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरं.
कृती : तांदूळ गरम पाण्यात भिजवा. थोड्या वेळाने मोकळा शिजवून घ्या. संत्रं सोलून, त्याचा गर मोकळा करून घ्या. टुटी-फ्रुटीच्याही अगदी बारीक फोडी करून त्या मोकळ्या करून घ्या. संत्र्याचा गर आणि टुटी-फ्रुटी एकत्र करा. कढईत तूप गरम करून, त्यावर कढीपत्ता, संकेश्‍वरी मिरच्या आणि चणा डाळ घालून परतवा. नंतर त्यात संत्रं-टुटी-फ्रुटीचं मिश्रण आणि हिंग व जिरं घालून परतवा. त्यात मीठ आणि तांदूळ घालून मिश्रण मोठ्या आचेवर परतवा. खमंग खट्टा-मिठा-तिखा राइस गरमागरम सर्व्ह करा.
टीप :
–    संत्र्याचा गर आणि टुटी-फ्रुटी यांचा कुस्करा होऊ देऊ नका.
–    टुटी-फ्रुटीऐवजी आदल्या रात्री चिरून ठेवलेल्या पपईच्या फोडीही या भातात घालता येतील.
खट्टा-मिठा-तिखा राइस