लुसलुशीत आंबोळी (Soft Rice Dosa)

लुसलुशीत आंबोळी (Soft Rice Dosa)

  1. लुसलुशीत आंबोळी

साहित्य : 2 वाटी जाडे तांदूळ, 4 टेबलस्पून उडीद डाळ, 1 टीस्पून मेथीदाणे, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तूप.
कृती : तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुऊन घ्या. नंतर सुती कापडावर पसरवून कोरडे करून घ्या. त्यात मेथीदाणे घालून गिरणीतून दळून घ्या. आता या आंबोळीच्या 2 वाट्या पिठात दीड वाटी पाणी मिसळून एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा. सकाळी त्यात मीठ घालून पुन्हा ढवळा.
आता लोखंडी तव्यावर थोडं तूप सोडून, त्यावर लहान-लहान आंबोळ्या घाला. आंबोळ्या मंद आचेवर एकाच बाजूने शिजवा आणि खाली काढा.
टीप : गौराईसाठी केलेल्या आंबोळ्या एकाच बाजूने भाजल्या जातात.