दही भात (Soft Curd Rice)

दही भात (Soft Curd Rice)

साहित्य : 1 वाटी इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदूळ, 2 वाटी घट्ट ताक, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून जिरं, थोडा लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ, 4 टेबलस्पून सायीचं दही.

कृती : तांदूळ स्वच्छ धुवा. ताकामध्ये हिंग, जिरं, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण तांदळात एकत्र करून मंद आचेवर भात शिजत ठेवा. भात तयार झाला की, त्यावर दही घालून कालवा. गणेशाला केळीच्या पानावर या दहीभाताचा नैवेद्य दाखवा.