मिश्र डाळींची शेव (Small Sticks Of Mixed Pulses)

मिश्र डाळींची शेव (Small Sticks Of Mixed Pulses)

मिश्र डाळींची शेव

मिश्र डाळींची शेव, Small Sticks Of Mixed Pulses

साहित्य : 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 2 टीस्पून जिरं, 2 टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हिंग, 2 टेबलस्पून तेलाचं मोहन, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती :
ओलसर कापडाने सर्व डाळी पुसून घ्या. नंतर साधारण सुकवून, कढईत कोरड्याच खमंग भाजून घ्या. सर्व डाळी थंड करून बारीक दळून घ्या. यात मीठ, मसाले आणि तेलाचं मोहन एकत्र करा. आवश्यकतेनुसार पाणी मिसळून घट्ट कणीक मळा. ही कणीक ओल्या सुती कापडात बांधून ठेवा. तासाभराने कणीक पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या. कणीक शेवेच्या साच्यात भरून थेट गरम तेलात शेव पाडा. शेव सोनेरी रंगावर तळा आणि टिश्यूपेपरवर काढा.