सिसम चिप्स (Sisam Chips)

सिसम चिप्स (Sisam Chips)

सिसम चिप्स

साहित्य : 5-6 लांबट मोठे बटाटे, अर्धा टीस्पून आमचूर पूड, 3 टीस्पून रेड चिली फ्लेक्स, 2 टेबलस्पून तीळ, अर्धा वाटी तेल, स्वादानुसार मीठ.

कृती : बटाटे स्वच्छ धुऊन, ओले असतानाच तासून घ्या. नंतर त्याचे लांबट फिंगर चिप्सप्रमाणे तुकडे करून घ्या. आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून, त्यावर बटाट्याचे काप लालसर रंगावर परतवून घ्या. बटाट्याचे काप शिजत आले की, त्यात तीळ घाला. तिळाचा रंग बदलल्यावर त्यात मीठ, आमचूर पूड आणि रेड चिली फ्लेक्स घाला. मिश्रण व्यवस्थित परतवून, गरमागरमच सर्व्ह करा.