श्रावणी सोमवार स्पेशल: उपवासासाठी रताळ्याचे सूप...

श्रावणी सोमवार स्पेशल: उपवासासाठी रताळ्याचे सूप (Shravan Special: Sweet Potato Soup For Fasting)

श्रावणी सोमवार स्पेशल: उपवासासाठी रताळ्याचे सूप

उपवासासाठी रताळ्याचे सूप, Sweet Potato Soup

साहित्य : 2 रताळी, 2 बटाटे, 2 वाट्या मलई, 2 वाट्या दूध, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 1-2 ओवा-बडीशेपची पानं.
कृती : रताळी आणि बटाटे तेल लावून गॅसवर भाजून घ्या. त्यानंतर किसून घ्या. दुधात 1 वाटी पाणी घालून ते गरम करा. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. मलई, किसलेेले बटाटे-रताळे आणि मिरच्या एकत्र करा. ते दुधात घाला. त्यात ओवा, बडीशेप आणि मीठ घालून सूपला एक उकळी आणा आणि गरमागरम सर्व्ह करा.

अ‍ॅपल चमचम (Fruit Recipe: Apple Chamcham)