शिंगाड्याचे मोदक (Shingada Modak)

शिंगाड्याचे मोदक (Shingada Modak)

शिंगाड्याचे मोदक

साहित्य : 100 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, 60 ग्रॅम तूप, 100 मिलिलीटर पाणी, 100 ग्रॅम साखर, 1 टीस्पून वेलची पूड, आवडीनुसार सुकामेवा.

कृती :
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मंद आचेवर शिंगाड्याचं सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात पाणी घालून मिश्रण गोळा होईपर्यंत परतवा. आता त्यात साखर, वेलची पूड आणि सुकामेवा घालून 4-5 मिनिटं शिजवा. नंतर आचेवरून उतरवून पाच ते सहा तास थंड होऊ द्या. नंतर मोदकपात्रात घालून, त्याचे मोदक तयार करा.