तिळ सॉस (Sesame Sauce)

तिळ सॉस (Sesame Sauce)

तिळ सॉस

साहित्य : 1 वाटी पांढरे तीळ, 10-12 लवंगा, 10-12 काळी मिरी, 2 वेलची, अर्धा वाटी घट्ट दही, 4 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.

कृती : दही रुमालात बांधून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका. नंतर त्या घट्ट दह्यात मीठ एकत्र करून ठेवा. आता एका कढईत तेल गरम करून त्यात लवंगा, काळी मिरी, तीळ आणि वेलची घालून खमंग परतवा. हे मिश्रण आचेवरून उतरवून थंड झाल्यावर जाडसर कुटून घ्या. कुटलेलं मिश्रण दह्यात घालून एकजीव करा आणि थंडच सर्व्ह करा.