तीळ पराठा (Sesame Paratha)

तीळ पराठा (Sesame Paratha)

तीळ पराठा


साहित्य : 2 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी चण्याचं पीठ, 1 वाटी तीळ, अर्धा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा टेबलस्पून गरम मसाला, अर्धा टेबलस्पून तूप, स्वादानुसार मीठ.

कृती : गव्हाचं, तांदळाचं व चण्याचं पीठ आणि मीठ एकत्र चाळून घ्या. तव्यावर तूप सोडून, त्यावर तीळ आणि लसूण हलके परतवून घ्या. त्यात गरम मसाला घालून, हे मिश्रण लगेच पिठात घाला. आवश्यकतेनुसार त्यात पाणी घालून घट्ट कणीक मळा. हे कणीक थोड्या वेळासाठी झाकून ठेवा. नंतर पराठे लाटून थोड्या तेलावर खमंग भाजून घ्या.