शेजवान बेबीकॉर्न (Schezwan Baby Corn)

शेजवान बेबीकॉर्न (Schezwan Baby Corn)

शेजवान बेबीकॉर्न

साहित्य : 400 ग्रॅम दोन भागात चिरलेले बेबीकॉर्न, पाव कप कॉर्नफ्लोअर, 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 8 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा टीस्पून अजिनोमोटो (ऐच्छिक), 3 बारीक चिरलेला पातीचा कांदा, 1 कप बारीक चिरलेला पांढरा कांदा, तळण्यासाठी तेल.

मॅरिनेशनसाठी :
1 टेबलस्पून आलं-लसणाची पेस्ट, अर्धा टीस्पून अजिनोमोटो (ऐच्छिक), 2 टीस्पून सोया सॉस, स्वादानुसार मीठ आणि काळी मिरी पूड, 1 टेबलस्पून व्हिनेगर.
सॉससाठी ः 3 टेबलस्पून टोमॅटो सॉस, दीड टेबलस्पून सोया सॉस, 2 टीस्पून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 कप पाणी.

कृती : बेबीकॉर्न 10 मिनिटं गरम पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी निथळून टाका. मॅरिनेशनसाठीच्या सर्व साहित्याचं एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण बेबीकॉर्नच्या तुकड्यांना व्यवस्थित लावून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये सॉससाठीचं सर्व साहित्य घालून व्यवस्थित एकत्र करा आणि मिश्रण दाट होईपर्यंत शिजवा.
कॉर्नफ्लोअरमध्ये थोडं पाणी एकत्र करून घोळ बनवा. आता मॅरिनेट केलेले बेबीकॉर्नचे तुकडे या कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणामध्ये घोळून गरम तेलात तळून घ्या. दुसर्‍या पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि अजिनोमोटो घालून 3 मिनिटं मोठ्या आचेवर परतवा. त्यावर उर्वरित सॉस व तळलेले बेबीकॉर्न घालून शिजवा. पातीचा कांदा घालून सजवून गरमागरम सर्व्ह करा.