बडीशेपचं सरबत (Saunf Sarbat)

बडीशेपचं सरबत (Saunf Sarbat)

बडीशेपचं सरबत

साहित्य : 4 वाट्या बडीशेप, 4 वाट्या साखर.

कृती : बडीशेप मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. एका भांड्यात 4 ग्लास पाणी आणि बडीशेपची पूड घालून 5-6 तास भिजत ठेवा. नंतर हे मिश्रण एका स्टीलच्या भांड्यात चांगलं उकळून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर गाळून घ्या. या रसात साखर एकत्र करून गॅसवर उकळून एक तारी पाक तयार करा. पाक थंड झाल्यावर काचेच्या हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा.

लाभ : या सरबताच्या नियमित सेवनाने भीषण उष्णतेपासून आराम मिळतो. तसंच दिवसभर ताजंतवानं वाटतं. उष्ण प्रकृती असलेल्यांसाठी बडीशेपचं सरबत म्हणजे रामबाण उपाय आहे. या सरबताने बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या आईच्या दुधातही वाढ होते.