सरसो का साग (Sarson Ka Saag)

सरसो का साग (Sarson Ka Saag)

सरसो का साग

साहित्यः 1 जुडी सरसोका साग (मोहरीची पाने), प्रत्येकी अर्धी जुडी पालक, बथुआ (करडई), 3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार, चिमूटभर साखर, अर्धा टीस्पून जिरे, 2 टेबलस्पून तूप, चिमूटभर हिंग, 2 बारीक चिरलेले कांदे, तमालपत्र.

कृतीः एका पॅनमध्ये सरसो, पालक व बथुआ उकडून घ्या. थंड झाल्यावर वाटून घ्या. आलं, लसूण व हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. एका कढईत तूप गरम करून तमालपत्र व जिरे टाका. हिंग व कांदा टाकून खरपूस परतून घ्या. मीठ टाका. सागची पेस्ट टाकून मध्यम आचेवर 10 -15 मिनिटे शिजवा.