चॉकलेट तिळाचे लाडू (Sankrant Special : Sesame L...

चॉकलेट तिळाचे लाडू (Sankrant Special : Sesame Laddoo)

साहित्य: पाऊण कप सफेद तीळ, 1 कप डार्क चॉकलेट पावडर, अर्धा कप खोबरं किसलेलं, पाव कप बेसन (भाजून घेतलेलं), पाव कप शेंगदाणे (भाजून जाडसर वाटून घेतलेले), अर्धा कप किसलेला गूळ, 1 टेबलस्पून तूप, चिमुटभर वेलची पूड.
कृतीः एका पॅनमध्ये तीळ सोनेरी होईपर्यंत भाजून मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या. नंतर त्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात गूळ विरघळवून घ्या. आचेवरून खाली घ्या. त्यात किसलेलं खोबरं, वेलची पावडर, भाजलेलं बेसन, शेंगदाण्याचा कुट, तीळ पावडर आणि डार्क चॉकलेट घालून व्यवस्थित एकत्र करा. हातांना तेल लावून घ्या. नंतर मध्यम आकाराचे बॉल्स बनवा.