सँडविच उत्तपा (Sandwich Uttapa)

सँडविच उत्तपा (Sandwich Uttapa)

sandwitch uttappa

sandwitch uttappa


साहित्यः
२ कप सूजी, १ कप दही, अर्धा कप पाणी, १ कांदा, १ टोमॅटो, १ गाजर आणि १सिमला मिरची, २हिरव्या मिरच्या (सर्व बारीक चिरून घ्या.), मीठ चवीनुसार, पाव कप तूप.

सँडविच बनविणसाठीः १ कांदा आणि १ टोमॅटो (गोलाकार चिरून घ्या), प्रत्येकी पाव कप शेजवान सॉस, हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस.

कृतीः एका बाऊलमध्ये दही, सुजी, मीठ, हिरवी मिरची आणि पाणी एकत्र करून तयार बॅटर १०मिनिटं बाजूला ठेवा. आता नॉनस्टिक तव्यावर तूप लावून पसरवा. त्यावर १ टेबलस्पून बॅटर घालून पसरवा. चिरलेला वर चिरलेला कांदा, गाजर, सिमला मिरची आणि टोमॅटो घालून हलकेच दाब द्या. उत्तपा दोन्ही बाजूने खरपूस शेकून घ्या. अजून दोन उत्तपे अशाच पद्धतीने बनवून घ्या.

सँडविच बनविण्यासाठीः एका उत्तप्यावर शेजवान सॉस, दुसऱ्यावर हिरवी चटणी आणि तिसऱ्यावर टोमॅटो सॉस लावा. नंतर पहिल्या आणि दुसऱ्या उत्तप्यांवर गोल कापलेले कांदा आणि टोमॅटो ठेवा.शेवटी तिसरा उत्तपा ठेवून तयार सँडविच सर्व्ह करा.