चंदन-वाळा सरबत (Sandle And Khus Sarbat)

चंदन-वाळा सरबत (Sandle And Khus Sarbat)

साहित्य : 5 ग्रॅम चंदन पूड, 5 ग्रॅम वाळा पावडर, 100 ग्रॅम साखर, 50 मिलिलीटर पाणी.
कृती : पाणी उकळून घ्या. उकळत्या पाण्यात चंदन आणि वाळा पावडर घालून आच बंद करा आणि दोन तास झाकून ठेवा. नंतर चमच्याने ढवळून गाळून घ्या. हे मिश्रण एक वाटी असेल, तर 2 वाटी साखर आणि एक वाटी पाणी यानुसार प्रमाण घ्या. पाणी आणि साखर एकत्र उकळून फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागलं की, गॅस बंद करून त्यात चंदन-वाळ्याचं तयार केलेलं मिश्रण घालून चांगलं ढवळून घ्या. हे मिश्रण गाळून बाटलीमध्ये भरून ठेवा.
लाभ :
-डोळ्यांची, लघवीची आग कमी करतं.
-सतत तहान लागणं, उन्हाळ्यात होणारा दाह यासारख्या उन्हाळ्यातील तक्रारींवर विशेष उपयुक्त आहे