केशराचं सरबत (Saffron Sarbat)

केशराचं सरबत (Saffron Sarbat)

साहित्य : 2 ग्रॅम केशर, दीड किलो साखर, अर्धा टीस्पून क्रीम ऑफ टार्टर, अर्धा टीस्पून सायट्रिक अ‍ॅसिड, 8 वेलच्या, 1 टेबलस्पून गुलाबपाणी, 2 थेंब गुलाबाचं व्हाईट इसेन्स, अर्धा टेबलस्पून पोटॅशियम मेटाबाय सल्फेट, अर्धा वाटी पिण्याचा सोडा (डिस्टिल वॉटर).
कृती : केशराच्या कांड्या बारीक करून गुलाबपाण्यामध्ये घाला आणि हे मिश्रण हवाबंद बाटलीमध्ये भरून एक दिवस बाजूला ठेवून द्या. दुसर्‍या दिवशी 2 लीटर पाण्यात साखर घालून उकळत ठेवा. साखर विरघळल्यानंतर त्यातील थोडं पाणी घेऊन त्यात क्रीम ऑफ टार्टर घाला आणि हे मिश्रण उकळत्या पाकात घाला. पाकावर आलेली मळी काढून, पाक स्वच्छ करा. थोड्या पाण्यात सायट्रिक अ‍ॅसिड मिसळून, तो घोळही या पाकात घाला. त्यामुळे पाक पारदर्शक होईल. दोन तारी पाक तयार झाला की, आच बंद करा. पाक थंड झाल्यावर मलमलच्या कापडातून गाळून घ्या. त्यात केशर, वेलची पूड, गुलाब इसेन्स घालून लगेच काचेच्या हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा. एक दिवस हे सरबत तसंच राहू द्या. दुसर्‍या दिवशी, अर्धा वाटी पिण्याच्या सोड्यामध्ये (डिस्टिल वॉटर) पोटॅशियम मेटाबाय सल्फेट मिसळा आणि ते सरबत भरलेल्या बाटलीमध्ये वरून अर्धा-अर्धा चमचा घाला. बाटलीचं झाकण घट्ट बंद करून ठेवा.