साबुदाणा भेळ (Sabudana Bhel For Fasting)

साबुदाणा भेळ (Sabudana Bhel For Fasting)

साबुदाणा भेळ

साहित्यः अर्धा कप साबुदाणा, १ बटाटा (तुकड्यांत कापलेला), चिमूटभर लाल मिरची पावडर, १ टेबलस्पून शेंगदाणे, १ टेबलस्पून काजू, १ टीस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून तेल, चवीनुसार सैंधव मीठ.

सजावटीसाठीः चिरलेली कोथिंबीर.

कृतीः साबुदाणा व्वस्थित धुऊन घ्या नि त्यात पाणी घालून २ ते २ तास भिजवून ठेवा. मंद आचेवर एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाले की त्यात बटाट्याचे तुकडे तळून घ्या. ते तपकिरी रंगाचे झाले की एका ताटामध्ये काढून घ्या. नंतर त्याच पॅनमध्ये शेंगदाणे आणि काजूही तळून घ्या नि भांड्यात काढून ठेवा. आता पुन्हा पॅनमध्ये थोडं तेल घाला. तेल गरम झालं की त्यात साबुदाणा घाला. हा साबुदाणा मऊ झाला की त्यात तळलेले बटाट्याचे तुकडे, शेंगदाणे, काजू, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून १ मिनिट शिजवा. नंतरआच बंद करा. शेवटी साबुदाण्यामध्ये लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार साबुदाणा भेळ कोथिंबीरने सजवा. आणि मग सर्व्ह करा.