बादशाही कबाब (Royal Kabab)

बादशाही कबाब (Royal Kabab)

बादशाही कबाब

बादशाही कबाब, Royal Kabab

साहित्य :
3 बटाटे उकडून कुस्करलेले, 50 ग्रॅम पनीर किसलेलं, अर्धा कप ब्रेड क्रम्स, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप काजूचे तुकडे, 2 टेबलस्पून मनुका, 2 टेबलस्पून टुटी-फ्रुटी, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून मोहरी, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, 1 टीस्पून आलं-मिरची पेस्ट, 1 कप मिश्र भाज्या (गाजर, फरसबी, मका, मटार इत्यादी), एका लिंबाचा रस, पाव कप बारीक चिरलेली सिमला मिरची, पाव कप बारीक चिरलेला कांदा, आवश्यकतेनुसार रवा किंवा ब्रेडक्रम्स, तळण्यासाठी तेल आणि स्वादानुसार मीठ.

कृती : भाज्या बारीक चिरून कुकरमधून शिजवून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. आता तेल आणि रवा किंवा ब्रेडक्रम्स सोडून उर्वरित सर्व साहित्य एका वाडग्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्या. या मिश्रणाच्या हृदयाच्या आकाराच्या वड्या तयार करा. हे कटलेट रवा किंवा ब्रेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. गरमागरम बादशाही कटलेट्स हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.