गुलाबाचं सरबत (Rose Sarbat)

गुलाबाचं सरबत (Rose Sarbat)

गुलाबाचं सरबत


साहित्य : 250 मिलिलीटर गुलाबपाणी, 3-4 टेबलस्पून रोझ इसेन्स, अडीच किलो साखर, 1 टीस्पून क्रीम ऑफ टार्टर, 1 टीस्पून सोडियम बेन्झोएट, 3 टेबलस्पून रोझ रेड कलर.

कृती : साखर अर्धा लीटर पाण्यामध्ये उकळून घ्या. साखर विरघळल्यानंतर पाक स्वच्छ करण्यासाठी, गरम पाकात पॅनच्या कडेने क्रीम ऑफ टार्टर घाला. आता पाकावर आलेली मळी काढून टाका. मिश्रणाचा दोन तारी पाक तयार करा. गरम पाण्यात सोडियम बेन्झोएट एकत्र करून, ते मिश्रण पाकामध्ये मिसळा. मलमलच्या कापडाने पाक गाळून घ्या. त्यामध्ये गुलाबपाणी, लाल रंग आणि रोझ इसेन्स घालून हवाबंद बाटलीमध्ये एक दिवस राहू घ्या. नंतर वापरायला घ्या.
टीप : याच प्रमाणे केवडा, चंदन आणि खस यांचं सरबतही बनवता येईल.