रोझ संदेश (Rose Sandesh)

रोझ संदेश (Rose Sandesh)

रोझ संदेश

साहित्य : 250 ग्रॅम पनीर, पाव कप पिठीसाखर, 1 टेबलस्पून पिठीसाखर, 1 टेबलस्पून मलई, 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर, काही थेंब गुलाबाचं इसेन्स, सजावटीसाठी चांदीचा वर्ख आणि थोडे बदामाचे काप.

कृती : बदामाचे काप सोडून उर्वरित सर्व साहित्य एका वाडग्यात चांगलं एकजीव करून घ्या. एका नॉनस्टिक पॅनमध्ये हे मिश्रण तीन-चार मिनिटं मंद आचेवर शिजवा. नंतर पूर्णतः थंड होऊ द्या. या मिश्रणाचे मध्यम आकाराचे पेढे तयार करा. प्रत्येक संदेशवर चांदीचा वर्ख आणि बदामाचे काप लावून सजवा. हे संदेश अर्ध्या तासाकरिता फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. नंतर थंडगार सर्व्ह करा.
टीप : हे रोझ संदेश दोन-तीन दिवस चांगले टिकतात.