गुलाब पाकळ्यांचं सरबत (Rose Petal’s Sarbat)

गुलाब पाकळ्यांचं सरबत (Rose Petal’s Sarbat)

गुलाब पाकळ्यांचं सरबत


साहित्य : अर्धा किलो गुलाबाची ताजी फुलं, 1 किलो साखर, 1 लिंबू, 175 मिलिलीटर गुलाबपाणी, 1 ते दीड चमचा रासबेरी रेड, अर्धा चमचा
सायट्रिक अ‍ॅसिड.

कृती : गुलाबाच्या ताज्या फुलांच्या पाकळ्या एक ते दीड लीटर पाण्यामध्ये किमान दोन दिवस भिजत ठेवा. नंतर पाकळ्या हलक्या दाबून त्यातील पाणी काढून घ्या. या पाण्यात साखर घालून ती विरघळेपर्यंत उकळवा. नंतर त्यात सायट्रिक अ‍ॅसिड घालून, मिश्रणावरील मळी काढून पाक स्वच्छ करा. या मिश्रणाचा दोन तारी पाक तयार झाल्यावर, त्यात लिंबूरस एकत्र करा. पाक थंड झाल्यावर त्यात गुलाबपाणी आणि रंग मिसळा. हे मिश्रण गाळून बाटलीमध्ये भरा. बाटलीचं झाकण
घट्ट लावा.
लाभ : हे सरबत सुगंधित असून, याच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. डोकं शांत ठेवण्यास उपयुक्त आहे. उन्हाळ्यात या सरबताच्या सेवनाने विशेष फायदा होतो.