थंडगार सोलकढी (Refreshing C...

थंडगार सोलकढी (Refreshing Cool Kadhi)

साहित्य : 1 मोठी वाटी ओल्या नारळाचा कीस, अर्धा कप कोकमाचं पाणी, 1 चमचा जिरं, 4 काळी मिरी, 2 हिरव्या मिरच्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 10-15 पुदिन्याची पानं, चवीनुसार मीठ आणि थंड पाणी.
कृती : सर्वप्रथम पुदिन्याची पानं एक कप पाण्यात 30 मिनिटं भिजवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचा कीस, जिरं, काळी मिरी, हिरव्या मिरच्या आणि 2 कप थंड पाणी घालून वाटून घ्या. नंतर एका पातळ कपड्याने किंवा बारीक चाळणीने सर्व जिन्नस गाळून घ्या. उरलेल्या चोथ्यात पुन्हा 2 कप पाणी घालून वाटून घ्या आणि एकदा पुन्हा मिश्रण गाळून घ्या. आता या गाळलेल्या मिश्रणात कोकमाचं आणि पुदिन्याचं पाणी (फक्त पाणीच घ्या, पुदिन्याची पाने काढून टाका.) घाला. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित घोळून घ्या. यात 6 कप थंड पाणी घालून एकजीव मिश्रण तयार करा. गरमागरम जेवणासोबत थंडगार सोलकढीचा आस्वाद घ्या.