कैरीचं झटपट लोणचं (Ready To Eat Raw Mango Pickle)

कैरीचं झटपट लोणचं (Ready To Eat Raw Mango Pickle)

कैरीचं झटपट लोणचं

साहित्य : 1 कैरी, 1 वाटी किसलेला गूळ, अर्धा वाटी तेल, अर्धा टीस्पून मेथीदाणे, 4 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून हळद, स्वादानुसार मीठ.

कृती : कैरी स्वच्छ धुऊन, तासून घ्या. नंतर किसा. कैरीच्या किसामध्ये मीठ आणि गुळाचा कीस एकजीव करून ठेवा. आता फोडणीच्या भांड्यात चमचाभर तेल गरम करून त्यात मेथीदाणे तळून घ्या. नंतर ते दाणे जाडसर कुटून कैरीच्या मिश्रणात मिसळा. आता उर्वरित तेल गरम करून त्यात हळद आणि लाल मिरची पूडची फोडणी करून, तीही कैरीच्या मिश्रणावर ओता. कैरीचं मिश्रण चांगलं एकजीव करून सर्व्ह करा.