रवा केक (Rawa Cake Recipe)

रवा केक (Rawa Cake Recipe)

रवा केक, Rawa Cake Recipe
साहित्य : 1 कप रवा, 1 कप दूध, 1 कप बारीक वाटलेली साखर, 1 कप घट्ट दही, 4 टेबलस्पून साजूक तूप, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 2-3 थेंब व्हेनिला इसेन्स, थोडे मिश्र सुकामेव्याचे काप (मनुका, काजू, बदाम, अक्रोड).
कृती : ओव्हन 180 डिग्री सेल्सियसवर प्रीहिट करा. एका वाडग्यामध्ये रवा, साजूक तूप, व्हेनिला इसेन्स, बेकिंग पावडर, सुकामेवा, साखर, दही आणि दूध एकत्र करून, दोन-तीन मिनिटं चांगलं फेटून घ्या.
ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये सर्वप्रथम सुकामेव्याचे काप घालून, नंतर रव्याचे मिश्रण घाला आणि एकसमान करा. हा ट्रे प्रीहिटेड ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सियसवर 35-40 मिनिटं बेक करत ठेवा.
टीप : दह्याऐवजी दोन अंडी फेटून या मिश्रणात मिसळता येतील.

पुरण पोळी (Festival Special Recipe : Puran Poli)