साखरांबा (Raw Mango Sweet Delite)

साखरांबा (Raw Mango Sweet Delite)

साखरांबा

साहित्य : 1 किलो कैरी (साधारण 4 मध्यम आकाराच्या कैर्‍या, म्हणजे 2 कप कीस होईल), 4 कप साखर (कैरीच्या आंबटपणानुसार हे प्रमाण कमी-जास्त करावं),
1 टीस्पून वेलची पूड, 6 ते 8 लवंगा, चिमूटभर मीठ.

कृती : सर्वप्रथम कैर्‍या सोलून, किसून घ्या. आतील कोय किंवा बाटा काढून टाका. एका जाड बुडाच्या स्टेनलेस स्टील किंवा नॉनस्टिकच्या भांड्यात कैरीचा कीस, साखर, मीठ आणि लवंगा एकत्र करून तासाभरासाठी तसेच ठेवून द्या. यामुळे कैरीला भरपूर रस सुटतो. तासाभरानंतर हे मिश्रण मंद ते मध्यम आचेवर शिजत ठेवा. अधूनमधून ते ढवळत राहा. साखर वितळून त्याचा पाक होऊ लागेल. पाक हळूहळू घट्ट होऊ लागेल. साखरेचा दोन तारी पाक तयार झाला की, गॅस बंद करा. पाक मधाप्रमाणे दिसेल. त्यात वेलची पूड घालून व्यवस्थित ढवळून घ्या. थंड झाल्यावर निर्जंतुक केलेल्या कोरड्या बरणीत भरून ठेवा.

टीप :
* कोरड्या हवेत हा मुरांबा वर्षभर टिकतो. दमट हवामान असल्यास, दोन महिने सामान्य तापमानात चांगला राहील;
पण नंतर फ्रीजमध्ये ठेवा.
* शक्यतो राजापुरी कैर्‍या वापरा. घट्ट, मांसल अशा या कैर्‍या लोणचं आणि मुरांबा बनवण्यासाठी आदर्श मानल्या जातात.