कैरीचा तक्कू (Raw Mango Special Pickle: Takku)

कैरीचा तक्कू (Raw Mango Special Pickle: Takku)

कैरीचा तक्कू

साहित्य : अर्धा कप किसलेली कैरी, 1 कप बारीक चिरलेला कांदा, 1 टीस्पून मोहरी, पाव टीस्पून मेथीदाणे, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 2 टीस्पून किसलेला गूळ, 2 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.

कृती : कैरी स्वच्छ धुऊन, तासून किसून घ्या. एका वाडग्यात कांदा, मिरची पूड, मीठ आणि गूळ चांगलं एकजीव करून घ्या. आता फोडणीच्या भांड्यामध्ये गरम तेलात मोहरीची फोडणी द्या. मोहरी तडतडली की, त्यात मेथीदाणे, हिंग आणि हळद मिसळा. फोडणी जरा थंड होऊ द्या. नंतर ही फोडणी कैरीच्या मिश्रणावर घालून, व्यवस्थित एकत्र करा आणि सर्व्ह करा.

टीप : कैरीच्या आंबटपणानुसार गुळाचं प्रमाण कमीजास्त करा.