कैरीचं लोणचं (Raw Mango Pickle)

कैरीचं लोणचं (Raw Mango Pickle)

कैरीचं लोणचं

 

साहित्य : 1 किलो कैरी, 150 ग्रॅम लाल मिरची पूड, 1 कप मोहरीची डाळ, 6 टेबलस्पून मेथीदाणे, 2 टीस्पून मोहरी, 2 टीस्पून हळद, दीड कप मीठ, दीड इंचाचा हिंगाचा खडा, 2 कप तेल, 1 टेबलस्पून तेल.

कृती : कैरीच्या लहान फोडी करून घ्या. एका पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात मेथीदाणे 5 मिनिटे परतवा. नंतर थंड करून त्याची जाडसर पूड करून घ्या. हिंगाच्या खड्याची बारीक पूड करून घ्या. 2 कप तेल गरम करून त्यात मोहरी आणि हळद घाला. मोहरी तडतडली की गॅस बंद करून, फोडणी थंड होण्यासाठी ठेवून द्या. मीठ कोरडंच थोडं भाजून घ्या. एका भांड्यात मेथी पूड, मोहरी पूड आणि लाल मिरची पूड एकत्र करा. त्यात थंड तेलाची फोडणी घालून एकजीव मिश्रण तयार करा. त्यात कैरीच्या फोडी आणि मीठ घालून व्यवस्थित एकजीव करा. हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून झाकण सुती कापड लावून घट्ट बंद करा. साधारण आठ दिवस लोणचं चांगलं मुरू द्या. त्यानंतर खायला घ्या.