कैरी-कांदा चटणी (Raw Mango-Onion Chutney)

कैरी-कांदा चटणी (Raw Mango-Onion Chutney)

कैरी-कांदा चटणी

साहित्य : 2 मध्यम आकाराच्या आंबट कैर्‍या, 1 मध्यम आकाराचा कांदा, 2 टीस्पून लाल मिरची पूड, एका लिंबाएवढा गूळ, 1 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट, स्वादानुसार मीठ.
फोडणीसाठी ः 1 टीस्पून तेल, अर्धा टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग, थोडी हळद.

कृती : कैर्‍या स्वच्छ धुऊन सालासकट मध्यम आकाराचे तुकडे करा. कांदा सोलून, त्याचेही मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. फोडणी व्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य, थोडं पाणी मिसळून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. आता फोडणीच्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करा. ही खमंग फोडणी कैरीच्या वाटणावर ओता आणि त्यात मिसळा. कैरी-कांद्याची आंबटगोड चटणी स्वादिष्ट होते.

टीप : कैरीच्या आंबटपणानुसार गुळाचं प्रमाण कमी-जास्त घ्या.