कैरीचं जिरं-पुदिना पन्हं (Raw Mango Juice With ...

कैरीचं जिरं-पुदिना पन्हं (Raw Mango Juice With Jeera And Pudina)

साहित्य : 2 वाटी वाफवलेल्या कैरीचा गर, दीड वाटी साखर, 2 टीस्पून सैंधव, 1 टीस्पून जिरे पूड, काही पुदिन्याची पानं, चवीनुसार मीठ.
कृती : कैरीचा गर, साखर, काळं मीठ, जिरं पूड, पुदिन्याची पानं आणि मीठ मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित वाटून घ्या. मिश्रण अगदी एकजीव व्हायला हवं. हे मिश्रण काचेच्या स्वच्छ हवाबंद बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.
सर्व्ह करताना त्यात आवश्यकतेनुसार थंड पाणी घाला आणि सर्व्ह करा.