कैरीचं आलेदार पन्हं (Raw Mango Juice With Ginger)

कैरीचं आलेदार पन्हं (Raw Mango Juice With Ginger)

साहित्य : 1 वाटी वाफवलेल्या कैरीचा गर, 2 वाटी गूळ, 1 वाटी साखर, अर्धा टीस्पून आल्याचा रस, अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून वेलची पूड, काही केशराच्या काड्या.
कृती : कैरीच्या गरामध्ये सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. हे मिश्रण काचेच्या स्वच्छ हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा. पन्हं तयार करायचं असेल तेव्हा, या आवश्यकतेनुसार थंड पाण्यामध्ये हे मिश्रण घालून एकत्र करा आणि सर्व्ह करा.