कैरीची डाळ (Raw Mango Fried Daal)

कैरीची डाळ (Raw Mango Fried Daal)

कैरीची डाळ

 

साहित्य : 2 कैर्‍या, दीड कप मूग डाळ, अर्धा टीस्पून हळद, 6-7 हिरव्या मिरच्या, 8-10 कढीपत्ते, 1 टेबलस्पून मोहरी, 1 टेबलस्पून जिरं, पाव कप बारीक चिरलेला कांदा, 2 सुक्या काश्मिरी मिरच्या, 4 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : कैरी स्वच्छ धुऊन, तासून घ्या. नंतर बारीक चिरून घ्या. मूग डाळ स्वच्छ धुऊन घ्या. आता कुकरमध्ये मूग डाळ, कैरी, मीठ, हळद, हिरवी मिरची आणि 3 कप पाणी घालून मिश्रण चांगलं एकजीव करा. कुकर बंद करून तीन शिट्या करा. कुकर थंड झाला की, डाळीचं मिश्रण घोटून घ्या.
आता पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कांदा, लाल मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी करा. कांदा पारदर्शक झाला की, त्यात घोटलेलं डाळीचं मिश्रण घाला आणि दोन मिनिटं उकळू द्या. नंतर आच बंद करून त्यावर कोथिंबीर घाला आणि कैरीची डाळ गरमागरम सर्व्ह करा.