कैरीची कढी (Raw Mango Curry)

कैरीची कढी (Raw Mango Curry)

कैरीची कढी

साहित्य : 1 कैरी, 2-3 टेबलस्पून बेसन, 2 हिरव्या मिरच्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.

फोडणीसाठी : 1 टेबलस्पून तेल, चिमूटभर हिंग,पाव टीस्पून हळद, 10-12 कढीपत्ते, अर्धा टीस्पून मेथीदाणे, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार गूळ.

कृती : कैरी धुऊन, तासून घ्या. नंतर किसा. एका स्टील किंवा नॉनस्टिकच्या जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून, त्यावर हिंग, मेथी, कढीपत्ते आणि हळद घालून खमंग फोडणी करा. नंतर त्यात कैरीचा कीस घालून मिनिटभर परतवा. थोड्या पाण्यात बेसन एकजीव करून घ्या. दुसर्‍या पातेल्यात पुरेसं पाणी उकळत ठेवा. पाणी उकळत असतानाच त्यात बेसनाचं मिश्रण, मीठ आणि गूळ घाला. एक उकळी आली की, हे मिश्रण कैरीच्या मिश्रणावर ओता. आच मंद करून कढी व्यवस्थित उकळू द्या. शेवटी त्यावर कोथिंबीर भुरभुरा आणि गरमागरम कैरीची कढी भाताबरोबर सर्व्ह करा.

टीप : कैरी किसायची नसल्यास, कैरीचे तुकडे करून मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं तरी चालेल.