कैरीचं सार (Raw Mango Curry)

कैरीचं सार (Raw Mango Curry)

कैरीचं सार

साहित्य : 1 मोठी कैरी, स्वादानुसार गूळ, 1 टीस्पून तूप, पाव टीस्पून जिरं, 2 चिमूट हिंग, 4-5 कढीपत्ते, 2 हिरव्या मिरच्या, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ.

कृती : कैरी स्वच्छ धुऊन कुकरमधून उकडून घ्या. नंतर कैरीची सालं आणि कोय काढून टाका. मिक्सरमध्ये कैरीचा गर आणि त्याच्या दुप्पट प्रमाणात गूळ घालून बारीक वाटून घ्या.
आता स्टीलच्या किंवा नॉनस्टिकच्या कढईत तूप गरम करून, त्यावर जिरं, हिंग, कढीपत्ते आणि मिरची ठेचून घाला. चांगली खमंग फोडणी करा. नंतर त्यावर कैरीचा गर घालून, आवश्यकतेनुसार पाणी घाला. मीठ घालून मिश्रणाला उकळी काढा. सार चांगलं उकळलं की, त्यावर कोथिंबीर घालून कैरीचं सार गरमागरम सर्व्ह करा.

टीप : कैरीच्या आंबटपणानुसार गुळाचं प्रमाण कमी-जास्त करा.