कैरीची चटणी (Raw Mango Chutney)

कैरीची चटणी (Raw Mango Chutney)

कैरीची चटणी

साहित्य : 2 मध्यम आकाराच्या आंबट कैर्‍या, 2 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, 3 टेबलस्पून खोवलेलं खोबरं, अर्धा टीस्पून साखर, 1 टीस्पून जिरं, थोडं आलं, स्वादानुसार मीठ.

फोडणीसाठी : 1 टीस्पून तेल, अर्धा टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग, 6-7 कढीपत्ते.

कृती : कैरी स्वच्छ धुऊन, तासून मध्यम आकाराचे तुकडे करा. मिरच्या आणि आलं धुऊन बारीक तुकडे करा. कोथिंबीर स्वच्छ करून धुऊन, साधारण चिरून घ्या. फोडणी व्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य, थोडं पाणी मिसळून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. आता फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून, त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ते घाला. फोडणी तडतडली की, ती चटणीच्या मिश्रणावर ओतून, एकत्र करा.

टीप : कैरीची चटणी फोडणीशिवायही चविष्ट लागते.