कैरीचा मुरांबा आणि छुंदा (Raw Mango Chhunda And...

कैरीचा मुरांबा आणि छुंदा (Raw Mango Chhunda And Muramba)

कैरीचा मुरांबा


साहित्य : 2 कप साल काढलेल्या लांबट आकाराच्या कैरीच्या फोडी, अडीच कप साखर, 1 कप पाणी, 1 टीस्पून वेलची पावडर, 1 मोठी दालचिनी, 2 अख्खे वेलदोडे, 4 लवंगा,
4-5 केशराच्या काड्या.
कृती : कैर्‍या धुऊन, साली काढून त्याच्या लांबट आकाराच्या फोडी करा. 2 कप फोडींमध्ये अडीच कप साखर नीट मिसळून रात्रभर झाकून ठेवा.
दुसर्‍या दिवशी या मिश्रणात 1 कप पाणी घालून मंद आचेवर शिजायला ठेवा. मिश्रण उकळून साखरेचा एकतारी पाक बनताच बाकीचे सर्व घटक पदार्थ त्यात घालून मिश्रण एकजीव करा. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा. वर्षभर कैरीच्या रसाळ मुरांब्याचा आस्वाद घ्या.

छुंदा


साहित्य : 1 कप किसलेली कैरी, 1 कप साखर,अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर.
कृती : दिलेले सर्व साहित्य एका नॉनस्टिक पॅनमध्ये गॅसवर मध्यम आचेवर गरम करत ठेवा. अधून मधून हलवत राहा. साखरेचा एकतारी पाक झाल्यावर गॅस बंद करा. थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवा. जेवणाची लज्जत वाढवणारा छुंदा बच्चे कंपनीला खूप आवडेल.