रसगुल्ला चाट (Rasgulla Chat)
रसगुल्ला चाट (Rasgulla Chat)

रसगुल्ला चाट
साहित्य : 12 तयार रसगुल्ले.
गोड चटणीकरिता : 500 ग्रॅम खजूर, 100 ग्रॅम चिंच, 100 ग्रॅम गूळ, प्रत्येकी 1 टीस्पून मिरची पावडर, धणे पावडर, 2 कप पाणी, चवीनुसार मीठ.
तिखट चटणीकरिता : 1 कप कोथिंबीर, 6-7 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ.
टॉपिंगकरिता : अर्धा कप दही, मिक्स मसाला (अर्धा टीस्पून काळं मीठ, धणे पावडर आणि चाट मसाला), गोड चटणी, तिखट चटणी, पाऊण कप डाळिंबाचे दाणे, सजावटीकरिता कापलेली कोथिंबीर.
कृती : गोड चटणी तयार करण्याकरिता सर्व साहित्य एकत्र करा आणि दहा मिनिटांकरिता शिजवून घ्या. थंड करून एकत्र वाटून घ्या आणि बाजूला ठेवा. तिखट चटणी तयार करण्याकरिता सर्व साहित्य एकत्र करा आणि वाटून घ्या. आवश्यकता वाटल्यास यात पाणी टाका. आता रसगुल्ल्यामधील रस काढून टाका. डिशमध्ये सगळे रसगुल्ले ठेवा. यावर फेटलेले दही टाका. वरून मिक्स मसाला भुरभुरवा. तिखट व गोड चटणी टाका. डाळिंबाचे दाणे आणि कापलेली कोथिंबीर टाकून सजवा आणि स्पायसी रसगुल्ला सर्व्ह करा.