राणी पालक (Ranee Palak)

राणी पालक (Ranee Palak)

राणी पालक

साहित्य: 2 जुड्या उकडून वाटलेला पालक, 1 टेबलस्पून तेल, प्रत्येकी 2 मोठे कांदे व टोमॅटोची पेस्ट, 1 टीस्पून आलं, बारीक चिरलेले लसूण व हिरवी मिरची, अर्धा टीस्पून जिरे, प्रत्येकी 1 बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो, पनीर सजावटीसाठी, 1 टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून जिरे पूड, मीठ चवीनुसार.

कृती: कांदा व टोमॅटो वेगवेगळे मिक्सरमध्ये वाटून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून कापलेले आलं, लसूण, जिरे व हिरवी मिरची टाका. कांदा व टोमॅटोची पेस्ट टाकून परतून घ्या. आता उकडलेला पालक टाका. यात मीठ, धणे पूड व जिरे पूड टाकून 5-7 मिनिटे शिजवा. किसलेल्या पनीरने सजवून सर्व्ह करा.