झटपट बेबीकॉर्न भाजी (Quick Babycorn Recipe)

झटपट बेबीकॉर्न भाजी (Quick Babycorn Recipe)

झटपट बेबीकॉर्न भाजी

साहित्य :  200 ग्रॅम उकडलेले बेबीकॉर्न, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 टीस्पून जिरे पूड, 1 टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून कांदा परतवून घ्या. त्यात बेबी कॉर्न आणि सिमला मिरची घालून परतवा. नंतर टोमॅटो घालून शिजवा. त्यात मीठ आणि सर्व सुके मसाले घालून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतवा. त्यात लिंबाचा रस घालून शिजवा. झटपट तयार झालेली ही बेबीकॉर्न भाजी कोथिंबीर घालून सजवा आणि चपातीसोबत गरमागरम सर्व्ह करा.