पुरणाचे कडबू (Purnache Kadbu)

पुरणाचे कडबू (Purnache Kadbu)

पुरणाचे कडबू

साहित्य : 1 वाटी चणा डाळ, सव्वा वाटी साखर, प्रत्येकी 1 टीस्पून वेलदोड्यांची व जायफळ पूड, आवडीनुसार सुका मेवा, दीड वाटी गव्हाचे पीठ, 4 टीस्पून मैदा, मोहनासाठी 3 टेबलस्पून तेल, तळण्यासाठी तूप.

कृती : चणा डाळ धुऊन कुकरमधून शिजवून घ्या. नंतर चाळणीवर उपसून पाणी निथळून घ्या. रवीने डाळ थोडी घोटून त्यात साखर घालून शिजवत ठेवा. डाळीचे मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होऊन पुरण तयार झाल्यावर आच बंद करा. पुरण थंड झाल्यावर त्यात सुका मेवा, वेलदोड्यांची व जायफळ पूड घालून एकत्र करा.
गव्हाच्या पिठात मैदा, थोडे मीठ आणि तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवून घ्या आणि थोडा वेळाकरिता झाकून ठेवा. नंतर पिठाच्या लहान पुर्‍या लाटून त्यात पुरण भरा आणि करंजीप्रमाणे कडा बंद करून कडेला मुरड घाला. तूप गरम करून त्यात हे कडबू तळून घ्या.