पुरणाचे मोदक (Puranache Modak)

पुरणाचे मोदक (Puranache Modak)

साहित्य : पारीसाठी : नेहमीप्रमाणे तांदळाच्या पिठाची उकड करून तयार केलेलं पीठ.
सारणासाठी : पाव किलो चणा डाळ, पाव किलो बारीक चिरलेला गूळ, स्वादानुसार वेलची-जायफळ पूड, थोडं केशर, तूप.
कृती : चण्याची डाळ मऊ शिजवा. डाळ शिजल्यावर यातील पाणी निथळून घ्या. कोरड्या चण्याच्या डाळीमध्ये गूळ एकत्र करून मंद आचेवर शिजत ठेवा. गूळ आणि चणा डाळ चांगली घोटून घ्या. गूळ विरघळू लागलं की, त्यात तूप आणि वेलची पूड घाला. हे मिश्रण चांगलं परतल्यानंतर त्यात केशर दुधात भिजवून घाला आणि आच बंद करा. मिश्रण चांगलं एकजीव करून, पुरणयंत्रातून वाटून घ्या. नेहमीप्रमाणे तांदळाची उकड काढून, त्याचे बारीक गोळे करा. या गोळ्याची पारी तयार करून त्यात पुरणाचं सारण भरा. छानशा चुण्या पाडून मोदक तयार करा आणि मोदक पात्रातून उकडून घ्या.