श्रावण स्पेशल: पुरणाची खीर (Puran Kheer)

श्रावण स्पेशल: पुरणाची खीर (Puran Kheer)

श्रावण स्पेशल: पुरणाची खीर


साहित्य : 1 वाटी चणा डाळ, 1 लीटर दूध, अर्धा टीस्पून वेलदोड्यांची पूड, काही केशर काड्या, पाव वाटी काजू-बदामाचे काप, पाऊण वाटी साखर.

कृती : कुकरमध्ये बेताच्या पाण्यात चण्याची डाळ शिजवून घ्या. गरम असतानाच डावाने घोटून घ्या. दुसर्‍या पातेल्यात दूध उकळवत ठेवा. दूध आटून पाऊण भाग झालं की, त्यात घोटलेलं पुरण, साखर, वेलदोड्यांची पूड, केशर काड्या आणि काजू-बदामाचे काप घाला. उकळी आल्यावर आच बंद करा.