कॉर्न पिझा (Puffy Corn Pizza)

कॉर्न पिझा (Puffy Corn Pizza)

कॉर्न पिझा

साहित्य : पिझा बेससाठी : 1 कप उकडलेल्या मक्याच्या दाण्यांची पेस्ट, 2 टेबलस्पून दही, 2 टेबलस्पून रवा, 1 टेबलस्पून बेसन, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, चिमूटभर फ्रूट सॉल्ट, 1 टीस्पून मीठ. सर्व साहित्य एकत्र करून घोळ तयार करून घ्या.
टॉपिंगसाठी : स्वादानुसार टोमॅटो केचप, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स, अर्धा कप बारीक चिरलेली सिमला मिरची, अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो. सर्व साहित्याचं एकजीव मिश्रण तयार करून घ्या.

इतर साहित्य : थोडं किसलेलं चीझ.

कृती : तवा गरम करून त्यावर पिझा बेसचं मिश्रण घालून पसरवा. एका बाजूने ते थोडं शिजलं की, ते परता. दुसर्‍या बाजूनेही बेस शिजत आला की, त्यावर टॉपिंगचं साहित्य पसरवा. त्यावर किसलेलं चीझ भुरभुरा. बेस कुरकुरीत झाला की, आचेवरून उतरवा. कॉर्न पिझा गरमागरम सर्व्ह करा.