पोटॅटो रोल्स (Potato Rolls)

पोटॅटो रोल्स (Potato Rolls)

साहित्य : 1 कप उकडून कुस्करलेले बटाटे, साडेचार कप मैदा, अर्धा कप पाणी, 1 पाकीट इंस्टंट यीस्ट पावडर, पाव कप साखर, पाव कप दूध, 6 टेबलस्पून बटर विरघळलेलं, 2 अंडी, अडीच टीस्पून रोझमेरी हर्ब कुस्करलेले, दीड टीस्पून मीठ.
मध-बटर टॉपिंगसाठी : पाव कप बटर, 2 टेबलस्पून मध. दोन्ही एकत्र व्यवस्थित फेटून घ्या.
कृती : एका वाडग्यात यीस्ट पावडर, पाणी आणि 1 टीस्पून साखर एकत्र फेटून, पाच मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून द्या. बन तयार करण्यासाठी बटाटे, उर्वरित साखर, दूध, फेटलेली अंडी, बटर, रोझमेरी हर्ब, मीठ, मैदा आणि यीस्टचं मिश्रण एकत्र करून 4-5 मिनिटं व्यवस्थित मळून घ्या. कणीक चिकट वाटल्यास, त्यात थोडा कोरडा मैदा मिसळून मळा. हे कणीक तासभर झाकून ठेवा. नंतर पुन्हा मऊ होईपर्यंत मळून घ्या. आता बेकिंग ट्रेमध्ये व्हॅक्स पेपर (पार्चमेंट पेपर) पसरवा. त्यावर थोडं तेल पसरवा. आता कणकेचे लिंबाएवढ्या आकाराचे गोळे तयार करून बेकिंग ट्रेमध्ये रचून ठेवा. ओव्हन 350 डिग्री फेरेनाइटवर प्रीहिट करून घ्या. या प्रीहिटेड ओव्हनमध्ये ट्रे ठेवून रोल्स सोनेरी रंगाचा होईपर्यंत बेक करा. रोल्स बेक झाल्यानंतर त्यावर ब्रशच्या साहाय्याने मध-बटरचं टॉपिंग लावा. त्यावर मीठ भुरभुरा आणि गरमागरम पोटॅटो रोल्स सर्व्ह करा.