पोटॅटो पॉकेट्स (Potato Pockets)

पोटॅटो पॉकेट्स (Potato Pockets)

पोटॅटो पॉकेट्स

साहित्य : 3 बटाटे उकडून कुस्करलेले, 2 टेबलस्पून बटर, 1 कांदा बारीक चिरलेला, अर्धा कप मैदा, 1 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड.

कृती : एका पॅनमध्ये बटर विरघळवून त्यात कांदा घालून मऊ होईपर्यंत परतवा. नंतर आचेवरून उतरवून कुस्करलेल्या बटाट्यांमध्ये घाला. त्यात मीठ, काळी मिरी पूड घालून एकजीव मिश्रण तयार करा. एका वाडग्यात मैदा, मीठ आणि तेल घालून एकजीव मिश्रण तयार करा. मिश्रणात गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. नंतर त्यात हळूहळू पाणी मिसळून मऊ कणीक मळून घ्या. हे कणीक दहा मिनिटं झाकून ठेवा. दहा मिनिटांनंतर कणीक पुन्हा मळून घ्या आणि त्याच्या लहान लहान पुर्‍या लाटा. या पुरीत बटाट्याचं सारण घालून करंजीप्रमाणे पॉकेट्स तयार करा. ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये हे पॉकेट्स व्यवस्थित रचून ठेवा, प्रीहिटेड ओव्हनमध्ये सोनेरी रंगाचे होईपर्यंत बेक करा. गरमागरम पोटॅटो पॉकेट्स सॉससोबत सर्व्ह करा.