बटाटा-खवा-ड्रायफ्रूट्स टिक्की (Potato- Khava- D...
बटाटा-खवा-ड्रायफ्रूट्स टिक्की (Potato- Khava- Dryfruits Tikki)

बटाटा-खवा-ड्रायफ्रूट्स टिक्की
साहित्य आवरणासाठी : 3 बटाटे उकडून कुस्करलेले, 50 ग्रॅम खवा किसलेला, 1 टीस्पून आलं-मिरची पेस्ट, पाव कप भाजलेलं बेसन, अर्ध्या लिंबाचा रस, चिमूटभर वेलची पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ.
सारणासाठी : पाव कप काजू, बदाम, अक्रोडाचे बारीक तुकडे, 2 टेबलस्पून मनुका, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून चाट मसाला, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून तूप.
कृती : आवरणासाठीचं सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून मळून घ्या आणि बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजू, अक्रोड आणि बदामाचे तुकडे क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्या. नंतर ते सारणासाठीच्या उर्वरित साहित्यामध्ये मिसळून, मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या. आता आवरणाच्या मिश्रणाची वाटी तयार करून त्यात सारण भरा आणि टिक्क्या तयार करून घ्या. या टिक्क्या तुपामध्ये सोनेरी रंगावर शॅलोफ्राय करून घ्या. गरमागरम टिक्क्या हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.