पोहा टिक्की (Poha Tikki)

पोहा टिक्की (Poha Tikki)

पोहा टिक्की

साहित्य : 2 वाटी बासमती पोहे, अर्धा वाटी तीळ, 4 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, तळण्यासाठी तेल, अर्धा वाटी ब्रेड क्रम्स, 2 टीस्पून गरम मसाला, स्वादानुसार मीठ.

कृती : पोहे स्वच्छ धुऊन, चाळणीवर निथळून मोकळे करा. पोहे मऊ झाले की, एका मोठ्या वाडग्यात काढून घ्या. त्यात तीळ, मीठ, बे्रड क्रम्स, गरम मसाला आणि आलं-लसूण पेस्ट घालून एकजीव मिश्रण तयार मळून घ्या. या मिश्रणाचे लहान लहान गोळे तयार करून गरम तेलात तळून घ्या. गरमागरम पोहा टिक्की सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.