शेंगदाणा रबडी (Peanuts Rabadi)

शेंगदाणा रबडी (Peanuts Rabadi)

शेंगदाणा रबडी


साहित्य : अर्धा लीटर (अंदाजे 3 कप दूध), अर्धा कप साखर, 1 टेबलस्पून वेलची पावडर, अर्धा कप शेंगदाण्याचा जाडसर कूट, 1 टीस्पून दुधात भिजवलेले केशर, 1 टेबलस्पून बारीक काप केलेला सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ता), 1 टेबलस्पून साजूक तूप.

कृती : प्रथम शेंगदाणे भाजून, त्याची सालं काढून मिक्सरमध्ये जाडसर कूट करा. नंतर एका कढईत तूप गरम करून त्यावर पाच ते सात मिनिटं शेंगदाण्याचा कूट परतून घ्या. हा कूट थंड होऊ द्या. नंतर एका पातेल्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा. एक उकळी आल्यानंतर दुधात साखर आणि वेलची पूड घाला. दोन-तीन मिनिटं आणखी उकळी येऊ द्या. नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट आणि केशर टाकून दोन ते चार मिनिटं उकळी येऊ द्या. मिश्रण सतत ढवळत राहा. त्यात सुका मेव्याचे काप घाला आणि एक उकळी काढून गॅस बंद करा. आता मिश्रण थंड होऊ द्या. फ्रिजमध्ये थंड होण्यास ठेवा. थंड रबडी खाण्यास मजा येते.

टीप : लक्षात ठेवा, शेंगदाण्याचा कूट जाडसरच ठेवा, तो खूप बारीक केल्यास दुधाला खाली चिकटेल आणि जळण्याची शक्यताही आहे. ही शेंगदाण्याची रबडी अवघ्या 10 मिनिटांत होते आणि उपवासालाही चालते.