शेंगदाण्याचा भात (Peanut Rice)

शेंगदाण्याचा भात (Peanut Rice)

शेंगदाण्याचा भात

साहित्य : अर्धा कप शेंगदाणे, अडीच कप शिजवलेला भात, 1 टेबलस्पून चणा डाळ, 1 टेबलस्पून उडीद डाळ, पाव कप खवलेला नारळ, 2 लाल सुक्या मिरच्या, पाव टीस्पून हळद,
1 टीस्पून तीळ, स्वादानुसार मीठ, दीड टेबलस्पून तिळाचं तेल, 1 टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग, 10 कडिपत्त्याची पानं.

कृती : प्रथम एका नॉनस्टिक पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घ्या. मग मध्यम आचेवर चणा डाळ, उडदाची डाळ, खोबरं आणि लाल मिरच्या वेगवेगळे भाजून घ्या व थंड होऊ द्या. नंतर भाजलेल्या डाळी, खोबरं, लाल मिरच्या, हळद व तीळ एकत्र करून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. त्यात भाजलेले शेंगदाणे घाला व जाडसरच वाटून द्या. हे मिश्रण एका खोलगट भांड्यामध्ये काढून घ्या. त्यात तयार भात आणि मीठ घालून चांगलं एकत्र करा व बाजूला ठेवा. आता एका पॅनमध्ये तेल गरम होऊ द्या. त्यात मोहरी व हिंग घाला. ते तडतडलं की त्यात कडिपत्ता घाला नि मंद आचेवर काही सेकंद ढवळा. मग त्यात भाताचं मिश्रण घालून चांगलं एकजीव करा. दोन-तीन मिनिटं चमच्याने ढवळत राहा. नंतर गरमगरम वाढा.