रम बॉल्स (Party Special : Rum Balls)

रम बॉल्स (Party Special : Rum Balls)

रम बॉल्स

साहित्य :  250 ग्रॅम केकचा चुरा (केक क्रम्ब्स), 75 ग्रॅम डार्क चॉकलेट विरघळलेली, 25 मिलिलीटर दूध, 2 टेबलस्पून बटर, 4 टेबलस्पून मिल्क पावडर, 1 टेबलस्पून रम.

कृती : थोडी चॉकलेट बाजूला काढून ठेवा. उर्वरित चॉकलेट गरम गरम घालून एकजीव मिश्रण तयार करा. केक क्रम्ब्समध्ये बटर आणि मिल्क पावडर मिसळून चांगलं फेटून घ्या. नंतर त्यात चॉकलेट पेस्ट घालून फेटा. शेवटी त्यात रम मिसळून एकजीव मिश्रण तयार करा. या मिश्रणाचे लहान-लहान गोळे तयार करा. हे गोळे विरघळलेल्या चॉकलेटमध्ये घोळवून थोडा वेळ सेट होऊ द्या. नंतर सर्व्ह करा.